12 जानेवारी रोजी या जिल्ह्याच्या सर्व शाळांना सुट्टी

गुरूवार, 11 जानेवारी 2024 (17:51 IST)
जालना- 12 जानेवारी म्हणजेच आईसाहेब जिजाऊ यांचा जन्मदिनानिमित्तत जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने उद्या दिनांक 12 जानेवारी रोजी सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 
 
बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या सिंदखेडराजा येथे त्यांचा जन्म झाला होता. हे ठिकाण जालन्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर असून येथून अनेक लोक दर्शनासाठी मातृत्व सिंदखेड राजा येथे जातात. आईसाहेब जिजाऊ जयंती निमित्त जिजाऊंच्या दर्शनाचा लाभ सर्वांना घेता यावा म्हणून जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने 12 जानेवारी रोजी सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 
 
जिल्ह्यातील खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयं अर्थसाह्य, जिल्हा परिषद, केंद्रीय प्राथमिक शाळा, कस्तुरबा गांधी विद्यालय अशा सर्व शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती