'त्या' प्रकरणात समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा

गुरूवार, 11 जानेवारी 2024 (09:18 IST)
एनसीबीचे माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना १५ फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाने दिलासा दिलाय. कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटक टाळण्यासाठी समीर वानखेडेंनी हायकोर्टात याचिका केलीय. समीर वानखेडेंवर तपासादरम्यान भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेत. मात्र १५ फेब्रुवारीपर्यंत त्यांची अटक टळलीय.  
 
वानखेडेंनी कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप सीबीआयने केला होता. सीबीआयनं दाखल केलेला खंडणीचा गुन्हा रद्द करण्यात यावा आणि अटक टाळण्यासाठी समीर वानखेडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
 
याप्ररकरणी आज हायकोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायालाने समीर वानखेडेंना १५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा कायम ठेवलाय. सीबीआयतर्फे एएसजी बाजू मांडणार आहेत.
 
कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी झाली त्यावेळी समीर वानखेडे हे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये झोनल डायरेक्टर होते. आर्यन खानला ड्रग प्रकरणातून मुक्त करण्यासाठी अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्याच्यासह अन्य चार आरोपींवर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती