लोकसेवा आयोगाने घडवला इतिहास, दुपारी मुलाखत, संध्याकाळी मेरिट लिस्ट

शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (08:58 IST)
पुणे : एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२२ ची मेरिट लिस्ट जाहीर झाली असून त्यामध्ये विनायक नंदकुमार पाटील याने राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर धनंजय वसंत बांगर हा दुसरा आला आहे. मुलींमध्ये अनिता विकास ताकभाते हिने बाजी मारली असून दिपा चांगदेव जेधे ही दुसरी आली आहे. विशेष म्हणजे राज्यसेवेच्या ६०० पदांसाठी गुरूवारी दुपारी मुलाखती घेण्यात आल्या आणि संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.

राज्यसेवेच्या ६०० पदांसाठी २०२२ साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम १८०० उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

मुलांमध्ये पहिले तीन : पाटील विनायक नंदकुमार,बांगर धनंजय वसंत, गावंडे सौरव केशवराव
मुलींमधील पहिले तीन : ताकभाते अनिता विकास, जेधे दिपा चांगदेव, म्हात्रे सोनाली अर्जुनराव.

Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती