आगामी सुनावणीपर्यंत नवाब मलिक सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबियांबाबत काहीही पोस्ट करणार नाही अशी हमी नवाब मलिकांच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे. नवाब मलिक- ज्ञानदेव वानखेडे प्रकरणाची सुनावणी द्विसदस्यीय खडपीठासमोर झाली. याची पुढील सुनावणी 9 डिसेंबरला होणार आहे. तोपर्यंत वानखेडे कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतंही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्य केलं जाऊ नये असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे.
नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जात प्रमाणपत्रावरुन संशय व्यक्त करत आरोप केला होता. याप्रकरणी समीर वानखेडे यांचे वकिल ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेत मानहानीचा दावा दाखल केला होता. आपल्या कुटुंबाविरोधात करण्यात येणाऱ्या वक्तव्यावर बंदी घालावी अशी दाद त्यांनी कोर्टात मागितली होती