मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी भर पडलीय. निवृत्त एसीपी समशेर पठाण यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 26/11 मधील दहशतवाद्यांविरोधातला महत्त्वाचा पुरावा असलेला मोबाईलच परमबीर सिंग यांनी नष्ट केल्याचं आपल्या पत्रात समशेर पठाण यांनी म्हंटलं आहे. 26/11च्या हल्ल्यावेळी परमबीर सिंग हे एटीएसमध्ये कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाइल स्वत:कडे ठेवून घेतला होता. आजतागायत तो कसाबचा मोबाईल तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही.