राज्यावर पुन्हा एकदा आस्मानी संकट

बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (16:59 IST)
राज्यात पुन्हा एकदा अस्मानी संकटांना हाक दिली आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्यामुळे महाराष्ट्र राज्याला आयएमडीकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतातून येणारे मोसमी वारे परतून जवळपास एक महिना झाला आहे. मात्र, महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. 
 
हवामान खात्याने आज एकूण चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत येथे मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
 
हवामान खात्याने आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. येत्या तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान आकाशात विजा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आकाशात विजांचा लखलखाट होत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच मोठ्या झाडाच्या कडेला उभे राहू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती