नागपूरला पुराचा तडाखा चौघे मृत, ७५० वाचवले

शनिवार, 7 जुलै 2018 (09:54 IST)
सध्या पावसाने राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये गेल्या सुरू असलेल्या पावसामुळे मोठा फटका दिला आहे. पावसामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूरची परिस्थिती अतिवृष्टीमुळे खराब झाली आहे. तर शहरातील अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने राजधानीत चौघांचा बळी घेतला आहे. त्यात पूर्ण दिवसात आणि रात्री एकूण ७५० लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
 
नागपुरात ढगांच्या गडगडाटासह सुरु असलेल्या पावसाने रामटेक येथे अंगावर वीज कोसळून २ जण ठार. तर शहरातील हुडकेश्वर नाला परिसरात २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. निलेश चावके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एका अनोळखी व्यक्तीचा कापसी महालगाव मध्ये मृतदेह सापडला होता. पावसामुळे मनपाकडे पाणी भरल्याच्या १६८ तक्रारी आल्या आहेत. आज आणि पुढील अनेक दिवस पाऊस सुरु राहणार असे हवामान विभागाने सागितले असू न आज नागपूरमध्ये शाळांना सुट्टी दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती