5 ते 14 ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (17:21 IST)

मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात  5 ते 14 ऑक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता काही हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या काळात शेतकरी बांधवांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे. अतिवृष्टीमुळे खरिपाचे उत्पादनास नुकसान होऊ शकते. सध्या कापणीयोग्य असलेल्या शेतमालास त्यामुळे फटका बसु शकतो. शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान टाळावे, यासाठी त्यांनी हा शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच जेथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. अतिवृष्टीमुळे शेती मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती