नाशिक, महाराष्ट्रासह भारतात सायकल चळवळीला बळ मिळावे यासाठी नाशिक सायकलिस्टस प्रयत्न करीत आहे. याच धर्तीवर स्वच्छता आणि पर्यावरण यांच्याबद्दल विशेष आस्था असलेल्या महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त २ ऑक्टोबर रोजी भारतीय सायकल दिन साजरा व्हावा यासाठीची नाशिक मुंबई सायकल रॅली सलग दुसऱ्या वर्षी करण्यात आली. ही रॅली यशस्वी होण्यासाठी डॉ. मनीषा रौंदळ, रवींद्र दुसाने यांनी प्रयत्न केले.