रायगड - माणगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तुफान कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे.प्रातांधिकारी ,तहसील ,भूमी अभिलेख कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे. काळ नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेकांच्या घरात आणि गणेशमूर्ती कारखान्यात पाणी शिरलं आहे.यामुळे गणेश मूर्तिकारांना मोठा फटका देखील बसला आहे.
रायगड - पेण तालुक्यातील अनेक भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. जोहे , हमरापूर , तांबडशेत भागात रस्त्यावर कंबरभर पाणी शिरलं आहे.अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे.गणेशमूर्ती कारखान्यांना या पुराचा मोठा फटका बसला आहे.अक्षरशः बाप्पाच्या मूर्ती भिजून कारखानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच बाळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.