Weather Update महाराष्ट्रात उष्णतेची लाट, 11 ते 4 बाहेर पडू नका : हवामान विभाग

बुधवार, 1 मार्च 2023 (09:35 IST)
मागील काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात प्रचंड वाढ होत आहे. राज्यातील थंडीचा जोर कमी झाला आहे. फ्रेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे.
 
महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिउष्णतेची लाट येणार आहे असं हवामान विभागाने म्हटलं आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
 
नागरिकांनी दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये अस आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती