खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमत चाचणीवर अवलंबून राहणे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात नाही का? असा प्रश्न विचारला आहे. दरम्यान, आजच्या सुनावणी ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी, तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी आणि हरीश साळवे, तर विधानसभा अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.
ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की, या प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी. कारण नोव्हेंबरमध्ये सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे त्याआधी सुनावणी होणे गरजेचे आहे, नाहीतर हे प्रकरण निरस्त ठरेल. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ विधानसभा अध्यक्षांनी लावला, असा आरोपही कपिल सिब्बल यांनी केला. तर दुसरीकडे शिंदे गटाची बाजू मांडताना हरिष साळवे म्हणाले की, ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केलेली कागदपत्रे आणि न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आहे. हा एक मुद्दा नसून असे अनेक मुद्दे आहेत. मुळात वस्तुस्थितीविषयी या प्रकरणात एकवाक्यता नाही. त्यामुळे याप्रकरणी कायदेशीर युक्तिवाद काय होणार? अशा प्रश्न शिंदे गटाने उपस्थित केला आहे.