ईडीचा छापा पडताच हसन मुश्रीफ 52 तास फरार का? समरजितसिंह घाटगे

मंगळवार, 14 मार्च 2023 (22:23 IST)
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना कोर्टाच्या निर्णयावर विश्वास नाही. जेव्हा ईडीचा छापा पडला तेव्हा मुश्रीफ 52 तास फरार होते. तुम्ही काय़ केलचं नाही तर 52 तास का गायब होता ? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केला. सगळ्यात वाईट म्हणजे ईडी येताच घरातील सगळे पुरुष मागच्या दरवाज्यातून फरार झाले ही सगळ्यात वाईट गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.
 
मुश्रीफांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, मुश्रीफांना हायकोर्टाचा कोणताच दिलासा मिळाला नाही.उलट त्यांना कोर्टाने दणका दिला आहे. ईडीच्या समन्सला स्टे करण्यासाठी ते कोर्टात गेले आहेत.ते त्यांच्या मर्जीने ईडी कार्यालयात गेलेले नाहीत.हायकोर्टाच्या निर्देशानुसारचं ते ईडी कार्यालयात गेले.आम्हाला अटक करायची नव्हती असा खुलासा ईडीने कोर्टात दिला. तुम्ही काय केले नाही म्हणता,मग मागच्या दाराने का पळून गेले? ईडी दारात आले त्यावेळी महिलांना पुढे करून पुरुष मागच्या दाराने पळून गेले.त्यांचा सर्वच स्टाफ नॉटरिचबल होता.
 
पुढे बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले की, 40 कोटी रुपये मुश्रीफांनी कोठे गायब केले हे समजू नये म्हणून त्यांचे चार्टर्ड अकाउंट महेश गुरव हे देखील गायब होतात. याचा अर्थ काय? हसन मुश्रीफ आरोपी नसून गुन्हेगार आहेत का? महेश गुरव सात दिवसापासून फरार आहे.तो फरार कि फरार केला यांचं उत्तर मुश्रीफ यांनी दयावे. ईडी मागे लागले म्हणून गुरव यांना फरार केले का? मुश्रीफ यांची फरार आणि कंपनी आहे का? या संपूर्ण प्रकारमुळे जिल्हा बँकेची बदनामी होतं नाही का? 52 तास बँकेचा चेअरमन फरार होतो? याचा अर्थ काय? नियम तोडून त्यांनी कर्जपुरवठा केलाय.ते गुन्हेगार आहेत का? हे लवकरच कळेल.आम्ही कोणतीही केस स्थगिती आणि रद्द करणार नाही,समन्स रद्द करणार नाही, असे कोर्टाने सांगितल्याचेही ते म्हणाले.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती