माझा मृत्यू झाला तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार

शनिवार, 30 मे 2020 (09:18 IST)
माझा मृत्यू झाला तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. रावसाहेब दानवेंवर सडकून टीका करतानाचा एक व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांनी युट्यूबवर टाकला आहे. '२००४ साली मला शिवसेनेची ऑफर होती, मात्र याबाबत तुम्ही मला कळवलं नाही, कारण जबाबदारी तुमच्यावर होती. माझ्या निवडणुकीला तुम्ही पैसे दिले म्हणतात, पण मी आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका माझी संपत्ती विकून लढलो,' अशी टीका जाधव यांनी केली आहे. 
 
'तुम्ही फक्त रागातून माझ्यावर खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. मला पोलिसांनी हे सांगितलं आहे. मी तुमच्यासोबत बोलायला दिल्लीला आलो, तर तुम्ही मला धमकावलं. माझ्या आईवर गुन्हा दाखल करायची धमकी दिली. माझ्या प्रॉपर्टीवरून तुम्ही खूप खालच्या भाषेत बोललात. तुम्ही राजकारण करताना घरं भरली, पण आम्ही लोकांचं काम केलं. तुम्ही कार्यक्रमात टेबल खुर्चीवर जेवता आणि माझ्या आईला मातीत बसवता, तिचा अपमान करता,' असे आरोप हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंवर केले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती