संजय राऊत (Sanjay Raut) हे शिंदे गटावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यांना शिंदे गटाचे आमदार, नेते आणि प्रवक्तेही प्रत्युत्तर देतात. नुकतेच मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना, संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जायचंय का? असा प्रतिप्रश्न केला होता. त्यावर, आता संजय राऊत यांनी केसरकरांना थेट इशारा दिला 2024 ला केसरकरांनीच तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असे राऊत यांनी म्हटले. यानंतर आता राऊतांनी रोखठोक ट्विट केलं आहे. "मला अटक करा, मला फाशी द्या किंवा मला गोळ्या घाला, मी पुन्हा सांगतो, मैं झुकेगा नहीं साला!" असं म्हटलं आहे. 
	संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलं आहे. "शिंदे गँगच्या दीपक केसरकरांकडून मला धमकी देण्यात येत आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे या धमक्यांकडे लक्ष देतील अशी आशा आहे. मिस्टर केसरकर, मला अटक करा, मला फाशी द्या किंवा मला गोळ्या घाला... मी पुन्हा सांगतोय, मैं झुकेगा नहीं साला!" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.