मंदिरातले पुजारी अर्धनग्न, मग भाविकांच्या कपड्यांवर निर्बंध का?

बुधवार, 2 डिसेंबर 2020 (11:11 IST)
"मंदिरातले पुजारी अर्धनग्न असतात मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का घातले जात आहेत?" असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला विचारला आहे.
 
शिर्डीतील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर भारतीय पेहरावात यावं. तोकडे कपडे घालून येऊ नये असं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं. या आशयाचे फलकही साई मंदिर परिसरात लावण्यात आले. याबाबत आता तृप्ती देसाई यांनी प्रश्न विचारला आहे. 
 
शिर्डीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती