भिवंडी तालुक्यात पिंपळास येथील आर.के.जी गोडाऊन येथुन घेवून जाण्यासाठी एक आयसर टेम्पो येणार असल्याची खात्रीशीर माहिती कोनगाव पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवताच अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव व सहकाऱ्यांनी कोनगावचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणपतराव पिंगळे यांच्या सह गोडाऊनवर धाड टाकुण टेम्पोतील २१ लाख ८५ हजार ९२० रुपये किंमतीचा विना लेबल प्लॅस्टीकची एकुण ४७ मोठी पोती, त्यामध्ये केसरयुक्त प्रिमीयम क्वॉलिटीचे एकुण १५,१८० प्रतिबंधीत गुटख्याचे पॅकेट व ८ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण २९ लाख ८५ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून टेम्पो चालक महादेव हनुमंत भोसले वय ४२ यास अटक केली. दरम्यान मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पराग भाट हे करीत आहेत.