फक्त लिपस्टिकच नाही तर ही खास वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, मंत्र्यांनी दिले विधान
रविवार, 9 मार्च 2025 (12:55 IST)
सध्या महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढत आहे. आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी महिलांनी त्यांच्या पर्समध्ये लिपस्टिक आणि पावडरसह चाकू आणि लाल तिखटाची पूड बाळगावी असा सल्ला दिला आहे.
ते म्हणाले जरी आज आपण महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलत असलो तरीही महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे.
पाटील यांनी या वेळी महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचललेल्या पावलांवरही प्रकाश टाकला, ज्यामध्ये एमएसआरटीसी बस भाड्यात 50 टक्के कपात, लाडकी बहीण योजना आणि मुलींसाठी मोफत शिक्षण यांचा समावेश आहे