अशी आहे रेड झोनची यादी

मंगळवार, 19 मे 2020 (21:21 IST)
राज्य सरकारने आता नवीन नियमावली जाहीर केली असून, त्यात काही भाग हे रेड झोन म्हणून घोषित केले आहेत. त्यामुळे हा भाग वगळता राज्यात इतर ठिकाणी अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. रेड झोनची यादी नेमकी कोणती हे पाहा….ही आहेत रेड झोन१. मुंबई महानगर प्रदेश – यामध्ये मुंबई महापालिकेसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निझामपूर, नवी मुंबई, वसई-विरार या पालिका रेड झोनमध्ये येतात.
२. पुणे महापालिका –
३. सोलापूर महापालिका
४. औरंगाबाद महापालिका
५. मालेगाव महापालिका –
६. नाशिक महापालिका
७. धुळे महापालिका
८. जळगाव महापालिका
९. अकोला महापालिका
१०. अमरावती महापालिका
 
रेड झोनमध्ये काय काय सुरू होणार?
१. दारूची दुकानं सुरू होतील/होम डिलिव्हरी सुरू राहील.
२. दवाखाने, क्लिनिक्स सुरू ठेवता येतील.
३. अत्यावश्यक सेवांसाठी चार चाकी वाहनांना परवानगी. टॅक्सी, कॅब आणि रिक्षाला परवानगी नाही.
४. अत्यावश्यक असल्यासच दुचाकीला परवानगी
५. मालपुरवाठा सुरू ठेवता येईल.
६. नागरी भागातील उद्योग/कारखाने सुरू करता येतील.
७. नागरी भागातील बांधकामे सुरू राहतील.
८. नागरी भागातील दुकाने मर्यादित स्वरूपात सुरू राहतील.
९. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील.
१०. अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेल्याही वस्तूंसाठी ई-कॉमर्स सेवा सुरू राहील.
११. सरकारी कार्यालये ५ टक्केच सुरू राहतील. कोणतीही खासगी कार्यालये सुरू करता येणार नाहीत.
१२. बँका आणि आर्थिक व्यवहारांची कार्यालये सुरू असतील.
१३. कुरीअर आणि पोस्ट सेवा सुरू असेल.
१४. वैद्यकीय अत्यावश्यक वाहतूक करता येईल.
१५. रेस्टॉरंट्स/किचन्समधून होम डिलीव्हरी मागवता येईल.
१६. उप निबंधक/आरटीओ/उप आरटीओ यांची कार्यालये सुरू होतील.
१७. दुकाने/मॉल्स/व्यवसाय यांना देखभाल दुरुस्तीसाठी काही काळ काम सुरू करता येईल. पावसाळ्यापूर्वीची काही तयारी करून ठेवता येईल. पण सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातच हे सुरू ठेवता येईल. मात्र, त्यांना व्यवसाय करता येणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती