ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज ऑफलाईन दाखल करता येणार

बुधवार, 30 डिसेंबर 2020 (08:02 IST)
राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास एक दिवसाचा अवधी बाकी असल्याने उमेदवारांची एकच झुंबड उडाली. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने एकेका उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी ताटकळत थांबावे लागले. मात्र, नागरिकांच्या तक्रारी आणि नेतेमंडळींनी हा मुद्दा उचलून धरल्याने निवडणूक आयोगाने नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा म्हणजे ऑफलाईन मोडमध्ये सादर करण्याचा आदेश निघाला आहे. 
 
राज्यभरात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदतही वाढविण्यात आली असून उद्या म्हणजेच 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर अर्जाचा पाऊस पडल्याने सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांना नामांकन भरण्यासाठी चक्क रांगा लावाव्या लागल्या. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती