ते म्हणाले की बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्यांच्यावरचे अरिष्ट दूर होऊन पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत अशी त्यांनी प्रार्थना केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंढरीचं परिसर पांडुरंगमय झाला असून आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. म्हणून तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे विठ्ठल पुजेसारखेच आहे.