सावित्रीबाई फुले यांचा गुगल कडून गौरव

देशात पहिली मुलींसाठी शाळा काढलेल्या आणि महिला म्हणून मोठी कामगिरी केलेल्या सावित्रीबाई फुले यांचा गौरव गुगलने  डूडलच्या माध्यमातून केला आहे. आपल्या देशात जेव्हा इंग्रज सरकार होते आणि आपल्या देशात महिला यांना कोणतेही अधिकार नव्हते तेव्हा महात्मा फुले यांच्या प्रेरणेने त्यांच्या पत्नी असलेल्या सावित्री बाई फुले यांनी सर्व विरोध झुगारून पुणे येथील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु केली होती. त्या काळात महिलांना शिक्षण हे पाप समजलेजात होते. सावित्रीबाई यांना फार मोठा विरोध झाला मात्र त्यांनी सर्व विरोध झुगारला आणि मुलीना शिक्षण दिले होते.
 
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
 
सावित्रीबाई फुले जन्म : नायगाव,तालूका खंडाळा, जिल्हा सातारा जानेवारी ३, इ.स. १८३१, मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७ या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

वेबदुनिया वर वाचा