सोन्याच्या दरात ऐतिहासिक घट

शुक्रवार, 13 मार्च 2020 (16:36 IST)
करोना विषाणुमुळे अर्थकारण ढासळत चाललं आहे. भारतीय शेअर बाजारात याचे परिणाम झाला आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरावरही याचे परिणाम झाले असून, दरात ऐतिहासिक घट झाली आहे.
 
शेअर बाजार उघडताच शुक्रवारी सोन्याचे दरही पडले. सोन्याच्या भावात २६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ४१,५५६ रुपयांवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरावर करोना विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात १२८ रुपयांनी घट नोंदवण्यात आली होती. त्यामुळे भाव ४४ हजार ४९० रुपयांवर आला होता. तर चांदीचे दरही ३०२ रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीला प्रति ४६ हजार ८८६ रुपये भाव होता. त्याचबरोबर कमॉडिटी मार्केटमध्ये (वस्तू बाजार) सोन्याच्या दरात ५८ रुपयांची घट झाली होती. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४३हजार २९७ रुपये इतका झाला होता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती