अर्धचंद्रकोरवाल्या बकऱ्यांची सोलापुर बाजारात चर्चा ,सर्वात जास्त मागणी

शुक्रवार, 8 जुलै 2022 (19:25 IST)
यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकाच दिवशी म्हणजे येत्या 10 जुलै रविवारी रोजी येत आहे. मुस्लिम बांधवांमध्ये ईद सणाचं महत्त्व आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव बकऱ्यांची बळी देतात.या सणासाठी बाजारपेठ बकऱ्यांनी गजबजलेलं आहे. जनावरांच्या बाजारात बकरे मोठ्या प्रमाणात आले आहेत. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे. मंडईत रताळ्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सोलापुरातील बाजारात बकरी ईद साठी चार लाख किमतीचा बकरा दाखल झाला आहे. चार लाख एवढी किंमत असणाऱ्या या बकऱ्याचे वैशिष्टये काय आहे, तर या बकऱ्याच्या कपाळावर अर्धचंद्रकोर आहे. हा बकरा दक्षिण सोलापूर तालुक्यातील कडबळ गावाच्या चंद्रकांत फुलारी यांचा आहे. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी दिल्या जाणाऱ्या बकऱ्यांपैकी कोणत्याही बकऱ्यावर चंद्र बनलेला असल्यास ते खूप शुभ मानले जाते. तसेच जर अशा चंद्राचा आकार त्याच्या शरीरावर असेल तर अल्लाह त्याची बळी स्वीकार करतो. अशी मान्यता असल्यामुळे  अशा बकऱ्यांची किंमत सर्वसामान्य बकऱ्यांपेक्षा जास्त आकारली जाते. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती