वाढती रुग्णसंख्या पाहता लसीकरणाची वेळ वाढवून द्या, मनसेने केली मागणी

गुरूवार, 1 एप्रिल 2021 (21:20 IST)
राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने लसीकरण मोहिमेचा वेगही वाढण्यात आला आहे. यातच आता ४५ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र ठरावीक वेळेत लसी दिली जात असल्याने लसीकरण केंद्रावर मोठ्याप्रमाणात गर्दी होत होती. यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता लसीकरणाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी मनसेने केली आहे.
 
याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी ट्विट करत, कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरणाची संख्या आणि व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच ४५ वर्षांवरील नोकरदार नागरिकांना लस घेणे सुलभ करण्यासाठी, लसीकरणाची वेळ वाढवून सकाळी ७ ते रात्री ९ करावी अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी नितीन सरदेसाई यांनी मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती