महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत आम्हाला प्रतिदिन केवळ ३६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स येत आहेत आणि आता नवीन वाटपानुसार, महाराष्ट्रात दररोज केवळ २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स प्राप्त होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता केंद्रसरकार देत असलेला साठा अपुरा पडून अजून गंभीर समस्या निर्माण होणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
केंद्रसरकारने राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा अशी मागणी सरकारने केली आहे. मात्र केंद्राने जाहीर केलेल्या डाटामध्ये फक्त २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन दिली जाणार आहे. इतकी कमी इंजेक्शन राज्यातील जनतेला पुरणार नाहीत. त्यामुळे केंद्रसरकारच्या या धोरणावर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.