महाराष्ट्र : छत्रपती संभाजी नगर मध्ये तरुणीवर कुत्र्यांनी केला हल्ला

गुरूवार, 20 जून 2024 (11:18 IST)
महाराष्ट्राच्या छत्रपति संभाजी नगरमध्ये सामान्य नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे. शहरामधील वेगवेगळ्या कॉलनिमध्ये 15 ते  20 भटके कुत्रे नागरिकांचा पाठलाग करतात. या भटक्या कुत्र्यांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहे. अशीच प्रत एक घटना घडली आहे. रस्त्याने चालणाऱ्या तरुणीला भटक्या कुत्र्यांनी घेरले व तिच्यावर हल्ला केला. 
 
तसेच या तरुणीने या कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व त्यामध्ये ती यशस्वी झाली. सुदैवाने यामध्ये तिला कोणतीही दुखापत झाली नाही. या भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या करीत लोक संभाजीनगर मध्ये या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महानगर पालिकेला नेहमी सूचना देत आहे. देशभरात या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक चिमुरड्यांना आपला जीव गमावला आहे. भटक्या कुत्र्यांच्या भीतीमुळे लोक त्यांच्या जवळून जाण्यासाठी घाबरतात. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती