तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, महाजन यांचा खडसेंना टोला

शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (09:17 IST)
भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, असा टोला राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला. आजही भाजपच्या ताब्यात राज्यातील 80 टक्के महापालिका आहेत. त्यामुळे आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी कारभार सुरु झाला, असे नव्हे. मुळात भाजप मोठा पक्ष आहे. भाजपमधून अनेक मुख्यमंत्री गेले आणि आले सुद्धा, पण त्याने फरक पडला नाही. त्यामुळे भविष्यातही भाजप पक्ष हा वाढतच जाईल, असा दावा गिरीश महाजन यांनी केला. 
 
 गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारला लक्ष्य केले. आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा आरक्षण दिले, केंद्राकडे जा, असे म्हटले नाही. मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही. तीन पक्षाचे सरकार असून महाविकास आघाडीच्या अर्ध्या मंत्र्याना वाटते की मराठा आरक्षण देऊ नये. हे सरकार आरक्षणाविषयी गंभीर नाही, दिल्लीत जात नाही, कमिटी करत नाही, कोर्टात तारीख आली की लक्ष ठेवत नाही. मात्र, राज्यातील जवळपास 90 टक्के मराठा समाज उपेक्षित असल्याने त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भावना गिरीश महाजन यांनी बोलून दाखविली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती