घोलप म्हणतात ; शिर्डी लोकसभेसाठी मीच उमेदवार !

शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (08:23 IST)
शिर्डी : लोकसभेच्या निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी आतापासूनच शिर्डी लोकसभेतील खासदार कोण याकडे जनतेचे लक्ष लागले असताना या मतदारसंघातील खासदार मी किंवा माझा मुलगा असेल एवढे मात्र नक्की अशा शब्दात माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या उमेदवारी बाबत भूमिका शिर्डी येथे एका कार्यक्रमात मांडली मागील खासदारकीच्या उमेदवारी वेळी न्यायालयीन निवाड्यामुळे त्यांची संधी सुटली होती त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसात खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा खासदारकीची संधी मिळाली होती
 
घोलप यांनी संपर्कप्रमुख या नात्याने नुकतीच शिर्डीत बैठक घेतली होती त्या बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे त्याबरोबरच त्यांच्या खासदारकीचे संकेत देखील शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात दिले होते न्यायालयीन तक्रारीचा निकाल येणे बाकी असला तरी निकाल झाल्यानंतर त्यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा रस्ता सोफा होईल असे असले तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी किंवा मुलगा उमेदवार असेल हे त्यांनी सांगितले आहे २०१४च्या लोकसभेचे वेळी त्यांनी मोठी प्रचार यंत्रणा देखील मोठी उभी केली होती मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली होती त्यामुळे अभ्यास १७ दिवसात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे या मतदारसंघाचे खासदार झाले होते मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांचा फारसा नसलेला जनसंपर्क मात्र कायमच मतदारसंघात चर्चेचा विषय झालेला असताना आता माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मी किंवा माझा मुलगा हे जाहीर केल्याने सध्या मतदार संघात भावी खासदार कोण या विषयावर चर्चा सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती