देशवासीयांची एकता म्हणजे 'ऑपरेशन सिंदूर', पहलगाममधील हल्ल्याला योग्य उत्तर दिले,अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

बुधवार, 7 मे 2025 (15:21 IST)
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख तळ बनलेल्या बहावलपूरलाही सशस्त्र दलांनी लक्ष्य केले. भारतीय लष्कराने रात्री उशिरा 1.05 वाजता जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे लष्करी हल्ले 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत करण्यात आले आहेत . या हल्ल्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक पोस्ट शेअर केली आणि याला देशवासीयांची एकता म्हटले.
ALSO READ: ऑपरेशन सिंदूरवर शरद पवार यांनी भारतीय सैन्याचे कौतूक केले ,संपूर्ण देशाला अभिमान आहे म्हणाले
अजित पवार यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले की 'ऑपरेशन सिंदूर' हे सशस्त्र दलांचे बळ, राजकीय इच्छाशक्ती आणि देशवासीयांच्या एकतेचे प्रतीक आहे. अजित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "भारताने दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेतली आणि आज सकाळी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करून पहलगाममधील हल्ल्याला योग्य उत्तर दिले आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. मी भारतीय हवाई दल, नौदल, लष्कर आणि 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. देशाला भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि संपूर्ण देश त्यांच्या मागे एकजूट आहे."
ALSO READ: Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर एकनाथ शिंदे म्हणाले- आम्ही पाकिस्तानला सोडणार नाही
अजित पवार यांनी पुढे लिहिले की, दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. अजित पवार यांनी लिहिले की, 'ऑपरेशन सिंदूर' ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद यापुढे सहन केला जाणार नाही. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश संतापला होता.
ALSO READ: ऑपरेशन सिंदूरमुळे संतोष जगदाळे यांच्या पत्नी ने सरकारचे आभार मानले
या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घेतली होती. प्रत्युत्तर म्हणून, भारताने आज सकाळी 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे सुनियोजित आणि अचूक हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत अशी कारवाई सुरूच राहील, असा संदेश देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
Edited By - Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती