RIP गणपतराव देशमुख

शुक्रवार, 30 जुलै 2021 (22:51 IST)
सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख (वय ९४) यांचे शुक्रवारी रात्री सोलापुरातील खासगी रूग्णालयात निधन झाले. विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा दक्षिण भारतातील द्रविड मुनेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांनी मोडला होता. सांगोला विधानसभा मतदार संघातून ते तब्बल ११ वेळा निवडून आले.
 
 महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची नाव कायम आदराने घ्यावे असे सांगोला तालुक्याचे 55 वर्ष ज्यांनी विधानसभेमध्ये नेतृत्व केलं राजकारणातील भीष्म भाई गणपतराव देशमुख यांनी सोलापुरात अखेरचा श्वास घेतला.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती