दोन सख्ख्या बहिणींचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार

गुरूवार, 17 मार्च 2022 (13:08 IST)
भालकीतालुक्तयातील आट्टरगा गावात दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेत अंकिता गोविंदराव मोरे वय 13 वर्ष आणि श्रद्धा गोविंदराव मोरे वय 15 वर्ष यांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी दोघी बहिणींवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
 
नेमकं काय घडलं होतं?
मुलींची आई शेताकडे गेली असताना त्यांना विहिरीच्या वरच्या बाजूस मुलींच्या चपला आणि ओढणी दिसली. तेव्हा शोधाशोध सुरु केली. ही घटना कळताच गावातील लोक धावून आले. तेव्हा मंगळवाारी रात्री 10 च्या सुमारास दोन्ही बहिणींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. नंतर शवविच्छेदन झाल्यावर देह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, आजी, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती