यंदापासून इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम लागू

शनिवार, 25 जून 2022 (18:29 IST)
कोरोनाच्या काळानंतर यंदापासून इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून यंदा परीक्षाही संपूर्ण अभ्यासक्रमानुसार होणार . गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन वर्ग सुरु असून अध्ययन अध्यापन मर्यादित स्वरूपात होते. परीक्षादेखील वगळण्यात आल्या होत्या. पण यंदाच्या शैक्षणिक वर्ष2022-23 पासून शाळा नियमित सुरु झाल्या असून आता यंदापासून पहिली ते बारावी पर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम लागू करण्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. 
 
करोनाचा प्रादूर्भाव मार्च 2020 मध्ये सुरू झाल्यानंतर शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. तर गेली दोन वर्षे प्रत्यक्ष शाळेत अध्ययन अध्यापन मर्यादित स्वरुपात होत होते. या परिस्थितीत विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होण्यासाठी 2020-21 मध्ये अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
पण यंदापासून इयत्ता पहिली ते बारावी सम्पूर्ण अभ्यासक्रम येणार असून परीक्षेत देखील संपूर्ण अभ्यासक्रम येणार.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती