Free treatment शासकीय रुग्णालयांत आता सर्वांना मोफत उपचार

शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (07:37 IST)
Free treatment for all in government hospitals  राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांत आता रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली.
 
भारतीय राज्यघटनेतील कलम २१ नुसार नागरिकांना आरोग्याचा अधिकार आहे. त्याचे पालन या निर्णयामुळे होणार आहे. सध्या या सर्व रुग्णालयांत वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे २.५५ कोटी नागरिक येत असतात. या सगळ्यांचे उपचार आता मोफत होणार आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था आहेत. या सर्व ठिकाणी नि:शुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत.
 
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक आणि अमरावती, कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती