वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांची स्वत:वर पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या

शुक्रवार, 26 मार्च 2021 (16:50 IST)
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुमामल वन्यजीव विभागाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वत:वर पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली  आहे. हरिसाल व्याघ्र प्रकल्प येथील शासकीय निवासस्थानी त्यांनी ही गुरुवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान स्वत:च्या छातीत गोळी झाडून घेतली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ४ पानांची सुसाईट नोट लिहिली आहे. 
 
दीपालीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये DFO विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठ अधिकारी डीओपी विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी आणि कर्मचाऱ्यांसमोर अश्लील शिवीगाळ करतात, रात्री बेरात्री भेटालया बोलवतात. त्यांच्या मनाप्रमाणे न वागल्यास वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देतात. असे दिपालीने सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे. तसेच यापूर्वी DFO विनोद शिवकुमार यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रेड्डी यांच्याकडे तक्रार केली मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याला उल्लेख दिपाली यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे.
 
या नोटमध्ये दिपाली यांनी आणखी एक गंभीर खुलासा केला आहे. तो म्हणजे शिवकुमार यांनी ट्रेकला बोलावले होते. पण त्या गर्भवती असल्याने ट्रेक करु शकत नव्हत्या. यावेळी शिवकुमार यांनी जाणूनबुजून ३ दिवस दिपाली यांना मालुरच्या कच्च्या रस्त्याने फिरवल्याने त्यांचा गर्भपात झाला असा खुलासा दिपाली यांनी सुसाईट नोटमधून केला आहे. आत्महत्येपूर्वी दिपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान संरक्षक रेड्डी यांच्या नावाने ही सुसाइड नोट लिहिली आहे.
 
दरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार यांच्याविरोधात RFO दिपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धारनी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शिवकुमार याने आधीही एका कर्मचाऱ्याला मारहाण केली माहिती समोर येत आहे. दरम्यान विनोद शिवकुमार या घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत होता परंतु नागपूर-बंगळुरू राजधानीमधून पसार होत असताना अटक करण्यात आली आहे. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. मात्र अद्याप रेड्डी यांच्यावर कारवाई न झाल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती