मनोज जरांगे पाटीलच्या विरोधात पाच गुन्हे दाखल

रविवार, 17 मार्च 2024 (14:11 IST)
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी मोठे आंदोलन केले. त्यांनी आरक्षण मिळवण्यासाठी ठिकठिकाणी सभा घेतल्या मराठा आंदोलनाला यश  आले सून कुणबी नोंद असलेल्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले तसेच मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याचा कायदा मान्य करण्यात आला.पण जरांगे यांनी कायदा न घेण्याचे मान्य करता मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. या साठी त्यांनात्यांनी उपोषण केले मात्र त्यांना राज्यसरकारने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांना ठार मारण्याचे आरोप देखील केले. तेव्हा पासून पोलीस त्यांच्यावर कठोर झाली आहे. 
 
मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहे. सध्या मनोज जरांगे हे बीडच्या दौऱ्यावर आहे. या दोन दिवसांत जरांगे यांच्या विरोधात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या पूर्वी त्यांच्या विरोधात चार गुन्हे दाखल करण्यात आले असून आता अजून पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
 
मनोज जरांगे पाटील यांचा बैठक उशिरा पर्यंत होतात.त्या सभांवर पोलिसांची कडी नजर आहे. त्यांच्या बैठक आणि सभा झाल्यावर पोलिसांनी मनोज जरांगे यांच्यावर माजलगाव, अंबाजोगाई या ठिकाणी गुन्हा दाखल केले आहे. सभा किंवा बैठकी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे. 
 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती