बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेतील न्यू लिंक रोडवरील न्यू विन्स हॉस्पिटलमध्ये दुपारी 1.48 च्या सुमारास आग लागली. माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दुपारी २.०५ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. ही आग रुग्णालयाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, सेंट्रलाइज्ड एसी युनिटचे कॉम्प्रेसर आदींपर्यंतच होती
वेळीच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही. सध्या आगीचे कारण समजू शकले नाही. या घटनेत स्वाधीन मुखी (56), राजदेव (35), नरेंद्र मुर्या (45) आणि सुनील (35) हे चार जण जखमी झाले असून यांच्यावर उपचार सुरु आहे. चौघांची प्रकृती स्थिर आहे.