मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड शहरातील एका कपड्यांच्या दुकानाला आग लागल्याने तीन दुकाने जळून खाक झाली, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. अग्निशमन विभागाच्या प्रयत्नांमुळे काही तासांनी आग आटोक्यात आली. पण, आगीमागील कारण अजून कळू शकलेले नाही.
पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, कुदळवाडी परिसरात रात्री उशिरा आग लागली. या घटनेत लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका दुकानातून लागलेली आग पसरली आणि इतर दोन दुकानांनाही तिने वेढले. अशी माहिती समोर आली आहे.