दक्षिण मुंबईतील आमदार वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, पोलिसांनी शुक्रवारी आमदार संजय गायकवाड आणि त्यांच्या समर्थकाविरुद्ध अदखलपात्र कलमांखाली गुन्हा दाखल केला.