माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की. सत्तेला घाबरत असाल तर काही करू शकत नाही. ज्या सत्तेची भीती वाटते अशी सत्ता काहीच कामाची नसते. ही सत्ता उलथवूनच टाकली पाहिजे. त्यासाठीच मी उभा आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे, असे ते म्हणाले.
सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोग नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही. ती सत्ता बदललीच पाहिजे. त्या जिद्दीने मी उभा आहे. सत्ता ही सर्वांना आपली वाटली पाहिजे. ज्या सत्तेची भीती वाटत असेल ती उलथवलीच पाहिजे. त्यासाठी आपण काम करत आहोत. त्या कामात तुम्ही सर्व सहभागी होत आहात. तुमचे स्वागत करतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावेळी शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
नवे वर्ष सुरू होत आहे. हे वर्ष लोकशाहीचे जावो, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते माध्यमांशी संवाद साधत होते. पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह पाचोरा येथील स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी उपस्थित होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेश कणाऱ्या सर्व नेत्यांचे स्वागत केले.