मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विनोबाभावे नगर येथे आरोपीचे आपल्या पत्नीशी वारंवार भांडण होत होते. आर्थिक त्रास आणि मुलांच्या संगोपनावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. शनिवारी देखील पती पत्नीमध्ये वाद झाले आणि ते वाद विकोपाला गेले.रागाच्या भरात आरोपीने पत्नीला मारहाण केली.नंतर आपल्या चार वर्षाच्या मुलीला उचलून जमिनीवर आपटले. या मुळे चिमुकलीला गंभीर दुखापत झाली. नंतर कुटुंबियांनी चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. उपचाराधीन असता चिमुकलीचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपीच्या विरुद्ध पोलिसांनी विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1) आणि 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे.