जालना येथे भीषण अपघात, जीप विहिरीत कोसळून, 6 जणांचा मृत्यू, 3 जखमी

शुक्रवार, 19 जुलै 2024 (09:46 IST)
जालना जिल्ह्यातील तुपेवाडी फाट्याजवळ जीप विहिरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. जालना -राजूर महामार्गावर तुपेवाडी फाटा येथे अपघात घडला. या जीप मध्ये 12 जण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. 

या काळ्या -पिवळ्या टॅक्सी मध्ये पंढरपूरातून भाविक वारी करून राजूरकडे जात असताना गाडीचे ब्रेक निकामी झाल्यामुळे वाहन रस्त्यालगतच्या विहिरीत जाऊन कोसळले. 

अपघाताची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. या अपघात 6 मृतदेह सापडली आहे. तिघाना गंभीर अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चणेगाव येथील काही भाविक पंढरपूरहून बसने जालन्याला आले होते आणि जालन्याहून राजूरला काळ्या-पिवळ्या टॅक्सीने जात होते. यावेळी हा अपघात झाला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीची माहिती घेतली आहे. पंढरपूरहून एका वाहनात 12 जण परतत असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला 

मुख्यमंत्र्यांनी फोन करून परिस्थिती जाणून घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी अपघाताबाबत शोक व्यक्त करत उपचाराचा सर्व खर्च प्रशासनाला उचलण्याचे निर्देश दिले.
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती