शेतकऱ्यांचं लॉन्ग मार्च आंदोलन आज राज्य सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित झालं आहे. शेतकरी नेते जे.पी गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे हे लाल वादळ स्थगित करण्यात आले आहे. जो पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन चालू राहणार पण राज्य सरकारने 70 टक्के मागण्या मान्य केल्या असून काही दिवसांत उर्वरित मागण्या देखील पूर्ण होतील अशी इच्छा बाळगतो. शासनाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या सात दिवसांपासून सुरु आहे. शेतकरी पुरुष आणि महिला या शेतकरी लॉन्ग मोर्चा मध्ये सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी दाखल होणार असून शेतकऱ्यांच्या नाशिकच्या परतीच्या प्रवासासाठी प्रशासनाकडून बसेस आणि दोन रेल्वेची व्यवस्था केली आहे. शेतकरी नेते जेपी गावित यांनी राज्यसरकारचे सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आभार मानले आहे.