फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले अमेरिकेचा राष्ट्रपती त्यांना हुंगतो तरी का?

शनिवार, 23 एप्रिल 2022 (21:24 IST)
“एक तर संजय राऊतांना विचारतं कोण? त्यांचं महत्व काय? संजय राऊत हेही म्हणू शकतात की अमेरिकेच्या राष्ट्रपतींना मी घाबरत नाही. अमेरिकेचा राष्ट्रपती त्यांना हुंगतो तरी का? संजय राऊत त्यांना माहिती तरी आहेत का? त्यामुळे ही अशी रोजची वक्तव्य करून ही असल्या प्रकारची कागदी लोकं राजकारणात फार काही परिवर्तन करू शकत नाहीत”, असा  खोचक शब्दांत निशाणा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे .
 
“संजय राऊतांना आम्ही फार काही गांभीर्यानं घेत नाहीत. त्यांचा पक्षही गांभीर्यानं घेत नाही. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ते सौजन्याची भाषा करतात. सौजन्य होतं कधी त्यांच्याकडे? ज्या प्रकारे तुम्ही मीडियासमोर बोलताय, तुमची वक्तव्य घरात परिवारासोबत बसून ऐकता येत नाहीत. हे शिवराळ लोक आहेत. हे राजकारणी थोडी आहेत”, असं देखील फडणवीस म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती