तसेच वाघासोबत ही घटना १५ ते २० दिवसांपूर्वी घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 31 मार्च 2025 रोजी शेजारील एका शेतकऱ्याने शेतातील तण जाळण्यासाठी आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत इराई धरणाचा गवताचा भागही जळून खाक झाला आहे. मृत वाघाची नखे, दात आणि हाडे सर्व शाबूत आहे. त्याचे अर्धे शरीर जळाले आहे. अशी माहिती सामोर आली आहे. वाघाच्या मृत्यूनंतर त्याला आग लावण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नमुने घेतले आहे. तपासानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.