नुकताच निवडणुका संपल्यांतर बोर्डाच्या परीक्षा सुरु झालेल्या आहेत. बारावी व दहावी चे बहुतेक विद्यार्थी अशावेळी मानसिक तणावाखाली येताना दिसतात. अभ्यासाचा ताण, घरात पूरक वातावरण नसल्यास किंवा अभ्यासाकडे दुर्लक्ष होणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक तणावात वाढ होते. मुलांच्या आहाराची काळजी, त्यांच्या भविष्याची काळजी यामुळे पालकांवरही परिक्षाकाळात तेवढाच ताण निर्मीण होते. यावर उपाय म्हणून टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एक हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. ज्या मुलांमध्ये मूळत: आत्मविश्वास कमी असतो, अशा मुलांवर मानसिक तणाव प्रभावी होणे अधिक धोक्याचे ठरते. दहावी, बारावी परिक्षांच्या काळात अशावेळी पालक किंवा नातेवाईक काय करू शकतात? याबद्दल योग्य मार्गदर्शन टीसमधील समन्वयक देत आहेत. बारावीच्या परिक्षा सुरू होण्याआधी आठवड्याभरात जवळपास 700हून अधिक कॉल या हेल्पलाईनवर आले आहेत. गेल्यावर्षी हा आकडा हजारावर गेला होता. बोर्डाच्या परिक्षांशिवाय सध्या जेईई एनईईटी या परिक्षांसाठीदेखील विद्यार्थी तयारी करत आहेत. तेव्हा ही हेल्पलाईन विद्यार्थी व पालकांना अत्तम मार्गदर्शक ठरत आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सतर्फे अशा पालक व मुलांसाठी ही हेल्पलाईन एक मदतीचा हात आहे. टीसमधील पारस शर्मा व तनुजा हे दोघे समन्वयक सध्या मुलांना डिप्रेशन, तणाव, आत्मविश्वास यासाठी मदत करत आहेत. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत उपलब्ध असते. विद्यार्थ्यांना जर मदत हवी असेल तर विद्यार्थी हेल्पलाईन क्रमांक- 022-25521111 /
[email protected] या संकेतस्थळावर संपर्क करु शकता. अशी माहिती टिस च्या समन्वयकांनी दिली आहे.