याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हे सैन्यातून निवृत्त झाले आहे. फेसबुकवर चॅटिंग करताना फिर्यादी यांची एका महिलेशी ओळख झाली.तीने फिर्यादी यांना शॉपिंग डॉट कॉम कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले व त्यांचा विश्वास संपादन केला. कंपनीचे उत्पादने विकल्यास तुम्हाला भरपुर कमिशन मिळेल, असे संबंधित महिलेने सांगितले.
10 ते 20 लाख रूपयांचा टप्पा पूर्ण होत नसल्याने त्यांनी कंपनीकडे पैसे परत मागितले. परंतू, 10 ते 20 लाखांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रक्कम काढता येईल, असे फिर्यादीला सांगितले गेले.