भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधातील पुरावे पक्षश्रेष्ठींकडे सुर्पूद

मंगळवार, 10 डिसेंबर 2019 (17:09 IST)
विधानसभा निवडणुकीत आपल्याविरोधात काम केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधातील पुरावे पक्षश्रेष्ठींकडे सुर्पूद केले आहेत. याबाबत माहिती देताना एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत माझ्याविरोधात भाजपच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी काम केले. यासंदर्भात आपण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपातील काही पुरावे सुर्पूद केले आहेत. ज्यांनी माझ्याविरोधात काम केले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती आपण केली आहे.
 
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या निवासस्थानी उभय नेत्यांची भेट झाली. तर खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती