अमरावतीत मागासवर्गीय समाजाच्या लोकांवर जातीय अत्याचार;100 जणांनी गाव सोडून ठोकला पाझर तलावावर मुक्काम

शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (16:06 IST)
महाराष्ट्रात जातीचा कलंक पुसता पुसल्या जात नाही फुले, शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या राज्यात अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील जातीय द्वेषातून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून दानापूर येथील शंभर अनुसूचित समाजाच्या लोकांनी गाव सोडले असून गावाशेजारील पाझर तलावाजवळ आश्रय घेतला असून त्यामुळे जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत गावात परतणार नसल्याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे आता या नागरिकांचे घरदार बेवारस झाले असून गावातील त्यांच्या मालमत्तेच्या सरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने सध्या खळबळ उडाली आहे.
 
दानापूर येथील दलित बांधवाची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदणच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे. परंतु गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित बांधवांचा आहे. या ठिकाणी आंदोलन करत असूनही दोन दिवसांपासून तोडगा निघाला नाही तर प्रकरण सामंजस्याने मिटवू अस चांदुर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती