दोन दिवसात राज्यातल्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप : सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात निवडणुका जाहीर होतील

शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (08:31 IST)
शपथविधीनंतर उर्वरीत मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. अशातच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठे विधान केले आहे. “दोन दिवसात राज्यातल्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होईल”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. तसेच, येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
 
सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर मंत्रिमंडलाचा विस्तार नेमका कधी, होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्यस्थितीत शिंदे-भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. यावर, “सरकार पडल्याची मळमळ असल्याने विरोधक ही टीका करत आहेत”, असा टोला मुनगंटीवारांनी विरोधकांना लगावला आहे.
 
“अनेकजण निवडणुका त्यात व्यस्त होते. मात्र आता सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले जात आहेत. फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय ओबीसी संदर्भात घेतला”, असेही त्यांनी म्हटले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती